पेंडखळे गावची आई श्री भवानी देवीची यात्रा दिनांक १३ जानेवारी आणि १४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
श्री जाकादेवी प्रसन्न ! श्री भवानी देवी प्रसन्न्न ! श्री शंकरेश्वर प्रसन्न ! श्री कुणकेश्वर प्रसन्न
![](https://dostinews.com/wp-content/uploads/2025/01/1001077673-1024x768.jpg)
कोकणातील राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावची जागृत देवस्थान नवसाला पावणारी देवी श्री भवानी देवीची वार्षिक यात्रोत्सव जत्रोत्सव दिनांक १३ जानेवारी आणि १४ जानेवारी २०२५ रोजी वेगवेगळ्या धार्मिक पारंपारिक विधींनी संपन्न होणार आहे.
१३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजता पोत पाजळण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक मंडळींनी दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .
![](https://dostinews.com/wp-content/uploads/2025/01/1001077672-1024x668.jpg)
खास आकर्षण असणारे नमन म्हणजे राजापूर तालुक्यातील नामांकित श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू , मधलीवाडी ह्यांचे स्त्री पत्राने नटलेले नमन असणार आहे .
देवी श्री भवानी देवीचे दर्शन घ्यायला लांबून लांबून मंडळी येतात . दोन दिवस यात्रा असते तरी सहपरिवार व मित्रमंडळींना घेऊन नक्की या.