नागरिकांची रडायची वेळ आली .
मुंबईतील काही मंडळी टोरेस कंपनीच्या बाहेर रांग लावून होते.
गुंतवणूकदारांनी प्रचंड गर्दी दादर हेतील टोरेस कंपनीच्या बाहेर केली , टोरेस कंपनीला गुंतवणूकदार वेळेवर रुपये भरत होते , काही मंडळींनी लाखोंची गुंतवणूक केली. काही गुंतवणूकदारांना हफ्ते सुद्धा चालू झाले . काही आठवडे गुंतवणूकदारांना हफ्ते आले नाही आणि त्याच बरोबर टोरेस कंपनीला संपर्क केला तर उत्तर नीट मिळत नव्हते तेव्हा हळू हळू गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं कि आपले गुंतवलेले रुपये बुडून तर गेले नाही ना त्यासाठी कंपनीमध्ये गेल्यावर निदर्शनात आले कि कंपनी बंद आहे तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला कि आपण जे रुपये गुंतवले ते गायब झाले .
दादर हेतील टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेर गुंतवणूक केलेल्या मंडळींची गर्दीची माहिती मिळताच मुंबई पोलीस हजर झाले .
गुंतवणूकदारांचं म्हणणं असं आहे कि पोलीस आले पण टोरेस कंपनीचे कर्मचारी आणि मालकांचे काहीच माहिती सांगत नाही आहे , त्याचबरोबर भाईन्डर , नवी मुंबई असं नामांकित भागात असलेल्या टोरेस कंपनीच्या बाहेर सुद्धा गुंतवणूकदारांनी प्रचंड गर्दी केली.
कंपनी १० टक्के रुपये प्रत्येक आठवड्याला देणार होती पण त्यांनी त्यांचं शब्ध पाळला नाही , डिसेंबर पासून त्यांनी १०% टक्के रुपये द्यायचे बंद केले तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला .म्हणजे गेले २ आठवडे हफ्ते आले नाही , काहींनी हजारो रुपये गुंतवले आणि काहींनी लाखो रुपये गुंतवले .
आता पुढे काय होईल तेच कळत नाही आहे , दिलेले रुपये द्या इतके दिले तरी चालेल पण १०% ( व्याज ) रुपये देऊ नका म्हणजे मुद्दल भरलेली ते द्या असे म्हणणे गुंतवणूकदार मंडळी म्हणत आहे .
टोरेस कंपनी / Torres Company मध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक नागरिकांनी केली आहे अशी माहिती समोर येत आहे पण कंपनीचे मालक परदेशात वास्तव्य आहे असे सांगण्यात येत आहे .